Monday, April 23, 2007

चंद्र अमेरिकेतला

दारात उभी राहून चंद्र न्याहाळताना वाटलं,
अमेरिकेतला चंद्र कसा दिसेल?
लखलखत्या दिव्यांच्या साथीला
आकाशाची थोडीतरी किनार असेल?
लेकाला विचारलं," बाबा रे ,असतो तरी कसा तो ?
दिसण्याने त्याच्या जीव तुझा सुखावतो ? "
तर म्हणाला, "आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.
आता बघावसं वाटल, तरी टाळतोच ती कल्पना,
वाटतं, कदाचित नसेल ना मागे शिक्का ' मेड इन चायना ?' "

6 comments:

कोहम said...

छान. Made in China चंद्र. असेल तर नक्की स्वस्तात बघायला मिळेल.

prabhavati said...

"आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.

Chhaan !!

Chaitra said...

आई,
अतीशय सुंदर आहे कविता..म्हणजे एक social scientist म्हणून सांगते आहे. कुठे तरी चांगल्या मासिकात पाठव. इतके issues आहेत त्यात आणि दोन वेगवेगळे perspectivesही. अतीशय mature कविता आहे.
ग्रेट!!!
चैत्रा

डॊ.मुक्ता पाठक शर्मा said...

Made in China चंद्र.
वा काय कोटी केली आहे.

आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.
मनातील हळवी बाजु.........

Abhijit Bathe said...

malaa tumacha likhaaN waachun aataa 'complex' yaayalaa laagalaay!

malaa waaTaayacha mee bhayaanak bhaaree lihito! te likhaaN wagaire Theek aahe, paN maajhyaat 'inherent conflict' kiwaa 'restlessness' itakaa kaa asato kaLat naahee. aaNi tumachyaa likhaNaat itakaa 'creative' samatol kasaa he hee....

Unknown said...

तर म्हणाला, "आई, खूपच दिवस झाले ग त्याला बघून,
शेवटचा भेटलो त्याला , तेव्हा भरवला होतास तू वरणभात ऊन ऊन.
....
Kaku, farach sundar....sopya shabdat amchya manat rengalnarya bhavana lihun dakhavlyat...thanks [:)]...
ani ho..."Made in China"...kharach asu shakel baraka :P

Smita