Thursday, April 26, 2007

क्षमा

तापलेल्या रस्त्यावरून सोलवटलेले पाय ओढत तुझ्या दाराशी आल्यावर
क्षणभर थांबून समोर सहज पाहिलं, तर
काटेरी मुकुटात जखडलेला दिसलास तू भिंतीवर
कललेली मान सावरत
रक्ताळलेले हात पेलत !
तुझं वेदनेनं कल्लोळलेलं शरीर
दौडवीत गेली अदीम थरथर
" वेदनेतून उमटलेला मायेचा हुंकार
रक्तातून घुमलेला क्षमेचा तत्कार
असावे बहुधा मिथक खोटे
थोडे रचलेले , थोडे लुटुपुटीचे!"
धुमसणार्‍या कराल तप्त लोंढ्याला थोपवत भिडवला तुझ्या डोळ्याशी डोळा,
,दाबलं पाऊल काट्यासह चिळकाम्ड्या उडवत चळचळा.
एक थंड लहर लपेटत चालली अंग भर
" देवा , क्षमा कर तू ह्याला ,खरच क्षमा कर!
क्षमेचा अर्थ उमगण्यासाठी तरी क्षमा कर !"
ठिबकणार्‍या रक्तातून,चरचरणार्‍या जखमेतून
हसलास तू कष्टाने,
" अग्नीने दाह द्यावा,
जलाने तो शांतवावा.
चाले तो जैसे ज्याचे मन
जल बन तू लेकरा, जल बन"
विरली वेदना विरले चराचर
नुरली वंचना , नुरले जहर............. !

वळून पाऊल टाकताना बाहेर, जाणवलं तू आहेस पाठी
,आधाराला देऊन क्षमेची काठी.
अर्थ जाणवला तुझ्या वचनाचा थोडासा ,
समजलाससं वाटलं तू जराजरासा !
draft

4 comments:

prabhavati said...

अग्नीने दाह द्यावा,
जलाने तो शांतवावा.
चाले तो जैसे ज्याचे मन
जल बन तू लेकरा, जल बन"
विरली वेदना विरले चराचर
नुरली वंचना , नुरले जहर.............

Farach sundar !

डॊ.मुक्ता पाठक शर्मा said...

विरली वेदना विरले चराचर
नुरली वंचना , नुरले जहर

डॊ.मुक्ता पाठक शर्मा said...

विरली वेदना विरले चराचर
नुरली वंचना , नुरले जहर

अतिशय मार्मिक.

"क्षमा करणे हे क्षमा केली" हे म्हणण्या इतपत सोपे आहे का? एखाद्याच्या चुकीवर अपराधावर पांघरुण घालुन त्याला माफ करण,क्षमा करण सहज शक्य असतं
मला वाटतय क्षमा करण सोप असतं,क्षमेच सामर्थ्य विराट असतं
प्रत्येक जीवात एक पवित्र आत्म्याची ज्योत तेवत असते.त्या ज्योतीच्या पावित्र्याला वंदन म्हणजे क्षमा.सामर्थ्य हे अशा क्षमेच असु शकतं.
आणि हे ज्याला उमगलय त्याला दुसर्याला क्षमा करण्यात काहीच वेळ लागत नाही.आणि कदाचित तोच परमेश्वर असावा ज्याने हे सर्व जाणले आहे.

Radhika said...

धन्यवाद, मुक्ता. प्रभा. क्षमा करणं अतिशय अवघड आहे. केवळ क्षमा केली म्हटल्यानंतरही ती मनात झिरपणं अतिशय अवघड आहे. म्हणूनच " तो " भिंतीवर असतो आणि आपण त्याच्या पायाशी .