शब्द असतात पहाटवेळी कोवळ्या गवतावर चमकणा-या दवासारखे
नाहीतर शब्द असतात त्सुनामीने झालेल्या भकास उजाड गावासारखे !
मानले तर शब्द असतात वेळू बनातल्या बासरीचे सूर
नाहीतर शब्द बनतात अलगुजातून फिरणारा वारा बेसूर !
शब्द मुके होतात ओथंबलेल्या घननीळ मनामुळे
शब्द मुके होतात रित्या पालथ्या घड्यामुळेही !
म्हणूनच
शब्द असावेत फुले मंद सुगंधी
शब्द नसावेत नकली माणिक मोती
शब्द तोडू देत खोट्या ताठर भिंती
शब्द फुलवू देत मना- मनांची नाती !

1 comment:
छान आहेत कविता!
Post a Comment