रविवारची सकाळ
प्रसन्न .....थोडीशी सुस्तावलेली ...आळसटलेली
सोफ्यावर दोन चार वर्तमानपत्र विस्कटून पडलेली
बातम्या-- अग्रलेख-- चटपटे , गंभीर लेख --शब्दकोडी पांघरून - ,
इमेल्स ,टारगेट , डेडलाईन हे शब्द पुसून टाकणारी सकाळ !
Relax---
चहाच्या तिस-या ( की चौथ्या पाचवा सहावाही असेल)
कपाच आधण चढवून ती ओटयाशी उभी , गुणगुणत
रविवार सकाळ पसरत असते कणाकणाने
फक्त अकरा वाजेपर्यंत
अकरा वाजतात
वातावरणात चैतन्य उत्सुकता
आजचा विषय काय असेल
राजकारण --- करप्शन----काळा पैसा ----
सत्यमेव जयते गीत सुरु होतं
जनसामान्यांनी जनांसाठी गायलेलं
ती शेगडी बंद करून ओटयापासून दूर होते
लसूण सोलायला घेऊन बाहेर येते
चिकन करायला लागेलच लसूण
उत्साहाचं कारंज बनून तो येतो
नमस्कार आदाब खुशामादिन करता करता विषयाला हात घालतो
बोलता बोलता आकडे मांडतो , मध्येच गंभीर होतो
कधी डोळ्यात तरळलेलं पाणी हळुवारपणे टिपतो
कधी जादूची झप्पी कधी खोल सुस्कारा
रडू आवरणारे प्रेक्षकांचे चेहरे
टी व्हीसमोरचं वातावरणही बदलतं
हवेत आलेला ताण तिच्या श्वासात शिरतो की तिच्या श्वासातला हवेत
न बघितलेल्या पिडीतांचे श्वास तिला हवेत जाणवायला लागतात
पोलीस स्टेशनमधली जबानी-डॉकटरांची तपासणी-- वकिलांची उलटतपासणी
कळ लागल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपली नखं आपल्या हातात घुसली आहेत
तोंडात कडवट चव जमा होते
मागच्या वर्षीही हाच विषय होता तेव्हा तिनेही एसेमेस केला होता
चार दिवस उदात्त वाटत होत
आज मात्र ते उघडे वाघडे प्रश्न ऐकताना तिचं अंग आक्रसू लागलं
खुर्चीत बसल्या बसल्या ती पाय मांड्या आवळून थरथर थांबवू पाहते
थांबवा हे सगळं. वर्णनातून होणारे हे बलात्कार थांबवा प्लीज !
आतून येणारे उमाळे दाबता दाबता आवाज होतोच
तिचा नवरा चमकून बघतो
ती कळवळून त्याला खूण करते
टी व्ही बंद करता करता तो म्हणतोच, "अग , कार्यक्रम लढणा-या स्त्रियांचा आहे. भारीच बुवा सेन्सिटिव्ह तू "
अचानक टी व्ही बंद झाल्याने नुकतीच मिसरूड फुटलेल्या मुलाच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह असतं
तिच्या डोळयाला मात्र धारा लागलेल्या असतात.

1 comment:
Post a Comment