उन्हे आली उताराला , लांबल्या सावल्या अता
वाट आता सरत आली निरोप द्यावा जिवलगा !
अनोळखी , अज्ञात आपण भेटलो बहरलो इथे
पांघरोनी चंद्रमौळी चांदणेही, शांतलो फुललो इथे !
जाणशी मम भाव राया, जाणते मीही तुला
भांडलो तम्डलो तरीही, शोधते मी तुलाअन तू ही मला !
पण
पण लांबल्या सावल्या आता; येई सूर कानी बावरा
हात हाती घेता तुझा मी, जीव होई घाबरा !
हुरहुरे मन थरथरे तन ,जीव ना मला हा सावरे
हात सुटता वाटे मला की , तू कुठे अन मी कुठे!
शब्द ओले भाव माझे जाणसी तू साजणा
तूच मी अन मीही तू ,जाण या अंतरीच्या खुणा !

No comments:
Post a Comment