काय असत की, एका ठराविक वयानंतर माणसाला आपल्या वेगवेगळ्या संकल्पना तपासून पाहण्याचा नाद लागतो. लहानपणी हे असले विचार मनात येणं अशक्यच. पराकोटीच्या हुशार किंवा अलौकिक व्यक्तिंबाबतच असली वैचारिक चर्चा संभवते. आणि आपण तर सर्व सामान्य. तरुण वयात आपली जी काही बरी वाईट मत असतात ती ठाम तयार झालेली असतात.शिवाय भवसागराच्या लाटा नाका तोंडात जाऊन जाऊन दमछाक होत असते . त्या लाटा परतावण्यातच निम्मी शक्ती खर्च होत असते.पण वय वाढल्यावर ( अग बयो , म्हण की म्हातारपणी ) वेळच वेळ. जी काही मदतनीसाची भूमिका असते ती पार पाडल्यानंतर वेळच वेळ. अशा वेळी मनात उन पावसाचा लपंडाव चालू असतो. तो कधी सुखद असतो तर कधी त्याला कातरतेची किनार असते. अर्थात ती क्षणभरच. कारण गेलेले दिवस परत येत नाहीत हे आता मनाने स्वीकारलेलच असतं.
लहानपणाची हीच तर गम्मत असते. निरागसपणा अजून मनात भरलेला असतो. सगळं जग ( म्हणजे आजूबाजूचे शेजारी , शाळेतल्या मैत्रिणी आणि शिक्षक ह्यापरत वेगळं जग असतं कुठे लहानपणी ?) चमत्कारानेच भारलेल असतं या वयात. अर्थात आता "असे" असंच म्हणावं लागेल. कारण आताची मुलं शास्त्रीय युगातली असल्यामुळे ज्या गोष्टी आम्ही डोळे मिटून मान्य करत होतो त्या गोष्टीतल्या तृटी सहजपणे शोधून त्यावरची उपाययोजनाही ते आपल्याला अशा सहजतेने सुचवतात की वाल्मिकी आणि व्यासांनी ह्यांच्या पायाशी बसून story telling चे धडे घ्यावेत.
पण आमच्या लहानपणी सगळ्या जगाची तीन भागात वाटणी झालेली होती. पैकी देव हे चांगले असल्याने ते आकाशात, माणूस अर्थात पृथ्वीवर आणि राक्षस ( ज्यांचं काढताच लपायची सगळ्यात सेफ जागा म्हणजे आईच्या पदराखाली ) हे पाताळात. बरं देवही तेहेतीस कोटी .वेगवेगळी शक्ती असल्याने वेगवेगळ्या संकटात त्यांचा धावा केला जायचा. म्हणजे परीक्षेत अडचण तर देवी सरस्वती. बुद्धी तर अर्थातच देवा श्रीगणेशा. शक्तीसाठी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आणि भूत प्रेत समंधादीसाठी रामरक्षा आणि भीमरूपी यांचा डबल डोस असायचा शिवाय या सगळ्या देवांची वस्ती गाईच्या पोटात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यामुळे दिसेल त्या गाईला हात लावून आम्ही मैत्रिणी पुण्याचा अखंड संचय करून ठेवत असू. कारण देवांच्या वस्तीत स्वर्ग आणि नरक अशीही एक विभागणी असायची. स्वर्गात गेलं तर प्रश्नच नाही. आपण फक्त कल्पवृक्षाखाली बसायचं आणि अमृत पीत रहायचं. कारण त्या अप्सरांच्या नाचात वगैरे आम्हाला रस नव्हता. पण नरकात जाऊन पापणीच्या केसाने मीठ गोळा करायच किंवा कढईत उकळत्या तेलात पडायचं म्हणजे अंमळ कठीणच होतं. असो. गेले ते दिवस आणि उरल्या त्या त्यांच्या निरागस आठवणी. चेह-यावर स्मितरेषा उमटवणा-या .
घरातलं बुद्धिवादी वातावरण, वाचनाने दिलेली व्यापक दृष्टी यामुळे देवाबद्दलची संकल्पना बदलायला लागली. देव मूर्तीत नसून माणसात आहे, याचं भान येऊ लागलं. पण तरीही संत वाचनातला भक्तभाव मनाला लुभावत होताच. संतांसाठी देवाने रूप धारण करावं, जनाई ला दळू कांडू लागावं, नरहर सोनाराला कमरपटटया साठी माप देताना कधी शंकर तर कधी विठ्ठलाचं रूप दाखवाव आणि सर्व देव एकच आहेत हे पटवावं. दामाजीपंतासाठी बादशहापुढे " तुमच्या महाराचा मी महार" म्हणावं , एकनाथा घरी पाणक्या श्रीखंड्या बनून पाणी भरावं यातला romanticism मनाला स्पर्शून जात होताच. पण काही मिळवण्यासाठी उपास कर, कुठलतरी स्त्रोत ५० वेळा वाच किंवा अमुक देवळाला अनवाणी पायाने प्रदक्षिणा घाल हे फारच हास्यास्पद वाटायचं. आयुष्यात अनेक कसोटीचे प्रसंग आले. पुढे अंध:कार असावा वाट दिसेनाशी झाली. त्यावेळी " परमेश्वरा" अशी आर्त हाकही ओठी आली पण ती ठेच लागल्यावर " आई ग...' ओठी आलं तितक्याच सहजतेची होती. जखमा धुवून पुसून आपणच मलमपट्टी करायची आहे हे माहीतच होतं.
वयानुसार भाबडेपणा अधिकाधिक कमी होत गेला. पण त्याचबरोबर तरुण वयात देव देव करणा-यांबद्दल जे कुत्सित उपहासाने बोललं जात होतं ते बंद झालं. आपल्याच आयुष्यात अगदी तरुण वयात आपणही काही जीवघेण्या प्रसंगात देवाला साकडं घातलं होतं, ते पूर्ण केलं होतं, हे आठवू लागलं. म्हाता-या सासूला बर वाटावं म्हणून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी निमुटपणे केल्या होत्या. क्वचित प्रसंगी मनाला न पटणा-या गोष्टी शिष्टाचार म्हणूनही केल्या होत्या त्या व्यक्तीच्या दुख-या मनाला आधार मिळावा मानूनही केल्या होत्या हे सगळं आठवलं मग लक्षात आलं,. मनुष्य काही गोष्टी जनरेटयामुळे करतो, मनुष्याला अशा वेळी नेहमीच त्याविरुध्द दंड थोपटता येतातच असं नाही. जोवर त्या समाजाला घातक नसतात तोवर तिकडे कानाडोळा करणच श्रेयस्कर अस् वाटायला लागलं. एकप्रकारची क्षमाशीलता सहानुभूतीची अनुभूती मनात यायला लागली. देवाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न तरी यापेक्षा वेगळा काय असणार, नाही का? आणि देवत्व म्हणजे तरी काय ? मनाची शुध्दता, आणि वृत्तीची निरागसता. हो ना?

No comments:
Post a Comment