Sunday, February 4, 2007

अंधार सर्वसाक्षी

अंधार गर्भवासी,
अंधार बीजरक्षी!
अंधारल्या उबदार कोषी,
पहुडल्या रक्तपेशी
स्पर्शण्या उन्मुक्त प्राची,वाट पाहती उद्याची!
अंधार सर्वसाक्षी
अंधार सर्वभक्षी !
अंधारल्या कालकोठी,
विसावल्या विदीर्ण पेशी
आसावल्या भयभीत नेत्री, वाट पाहती उद्याची!

2 comments:

prabhavati said...

सुरेख ! अतिशय सुरेख !

nilesh said...

प्रकाश हा विश्वव्यापि
प्रकाश हा सर्व व्यापि
प्रकाश हा अग्यानभक्शि
प्रकाशमय हि धरती सारी...


खुप छान आहे तुमची कविता
पन थोडी निराशाजनक् वाटलि
म्हनुन ही प्रतिक्रिया