Sunday, February 4, 2007

कातरवेळी

Radhika
दिव्याच्या उजे्डाचा एक एक ठिपका, अंधार अधिकच गडद करत जातो,
पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त, रिक्तसं होत जातं,
दारात उभी राहते मायमाउली, बाहू पसरून पिलासाठी!
' एक घास काऊचा, एक चिऊचा
साथीला विळखा उबदार मायेचा."
उसळे तरंग काळजात परतल्या बाळपावलांसाठी !
दिव्याच्या उजेडाचा एक एक ठिपका, अंधार अधिकच गडद करत जातो,
पावलांच्या गलबल्याचं मैदान रिक्त रिक्तसं होत जातं,
दारात उभी राहते मायमाउली , बाहू पसरून पिलासाठी !
"रंग विलोल नेत्रांनी, धुंद मत्त गात्रांनी,"
दडपे कल्लोळ काळजात परत फ़िरल्या बाळपावलासाठी !

delete

2 comments:

prabhavati said...

"रंग विलोल नेत्रांनी, धुंद मत्त गात्रांनी,"
दडपे कल्लोळ काळजात परत फ़िरल्या बाळपावलासाठी !

स्त्री एरव्ही कुणीही असो, हे आईचं रूप चिरंतन !बाकी सर्व क्षणिक .किती सुरेख मांडलंय्‌.

निशा............ said...

मस्त़