Sunday, February 4, 2007

सोबती

अंधारही कधी कधी सखा बनतो, बंद पापणी आडचे अश्रू टिपून घेतो.
सुसाटणाया वायात,
भिरभिरणाया पाचोळ्यात,
गरगरणाया चक्रात
अंधारच सोबतीला येतो.
अशा वेळी दारं खिडक्या बंद कराव्यात, हवं तर गदद पडदेही सो्डावेत
गरगरणारं चक्र,
भिरभिरणारा पाचोळा
सुसाटणारा वारा
सगळं बाहेर ठेवावं
आत फ़क्त निस्तब्ध अंधार आणि साथीला विरह गंधार!
मग उधळून द्यावं स्वत:ला अश्रूवाटे नि:शंकपणे
खात्री असते

सोबतीचा अंधार टिपून घेइल अश्रू अलगद ह्ळूवारपणे
कारण... तेव्हाही तोच होता ना साथीला
सुसाटणाया वायात
भिरभिरणाया पाचोळ्यात
गरगरणाया चक्राच्या तप्त रंगोत्सवात !

2 comments:

नाम गुम जायेगा said...

फ़ार छान कविता. आणि फ़ुलतोड्यंचा ब्लॉगही आवडला.

prabhavati said...

अप्रतीम कविता. कौतुकाला शब्द नाहीत !