Wednesday, February 21, 2007

सागर

सागर सतत बोलवत असतो
कोवळ्या उन्हाच्या चमचमत्या लाटात
सिंदबादच्या गल्बताला
रत्नजडीत संदुकेला
एकडोळ्या चाच्याला
दूर क्षितिजावर झुलवत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !
उधाणलेल्या लाटांनी,
उसळणाया तुषारांनी,
मत्त धुंद गाजेनी,
चिंब आवेगाने खुणावत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !
अस्ताच्या रक्तवर्ण मित्रासह,
काजळणाया धूम्रवर्ण नभासह,
किनायाशी फ़ुटणाया फ़ेनपुष्पासह
थोपटत शांतवत राहतो
सागर सतत बोलवत राहतो !

4 comments:

prabhavati said...

सागराच्या गरजणार्‍या हाकेला
तेवढीच आसुसून 'ओ' द्यावी
सिंदबादच्या गल्बतातून
आपणही सैर करावी
उधाणाबरोबर उती जावं,
धुंदीसवे बेहोष व्हावं
ओलेत्या लाटेवर संध्येच्या कुशीत
क्षितीजाच्या साक्षीने समर्पित व्हावं !

nilesh said...

grate sagar pravas

Asawari said...

hey r u getting senti in these poems which have a deeper meaning than what appears at first glance or am i paranoid and am trying to add meaning to a poem about the sea?

felt like it goes deeper than what it appears at first read - all the poems...............

Radhika said...

आभारी आहे, प्रभा, निलेश, आसावरी !