Sunday, December 31, 2006

धमाका

समोरच्या स्क्रीनवरची रक्तबंबाळ माणसं,
थिजलेल्या चेहयाच्या सुन्न नजरा,
खिडक्यांवरचा लाल रंग,
काळजाला कुरडत जातो,
वारंवार वेगवेगळ्या चानल्सवर
आलटून पालटून येणारी
तीच दृश्य पाहताना
कानात घुमतो तुझा थरथरता स्वर---
" आई, मी सुखरुप आहे---
माझ्या मागेच उडाला धमाका
पण आई ग
मी सुखरुप आहे---"
त्याच वेळी ही जाणीवही कुरडते,
दोन मिनिटांच्या फ़रकाने
केवढी उलथापालथ झाली असती
कदाचित ! कदाचित ! क दा चि त !
स्क्रिनवरची अक्षरं धूसर होतात
डोळ्यातल्या पाण्याने
पण कळत नाही
ते पाणी
अमानुष विखारी थैमानाच्या निष्पाप बळींसाठी असतं
की नियतीच्या कृपेच्या आभाराचं देखील ?

1 comment:

Asawari said...

It must be really disturbing to read about or watch any catastrophe in an area where anyone you are close to resides (and even otherwise). Even if one can get a quick confirmation via e-mails or phone calls that alls well there is always the creeping thought about "what if it had'nt been well" and whats worse there is another thought "it was ok this time but will they be as lucky the next time?"

Am I sounding insane???