Friday, December 29, 2006

सुप्रभात ?

सकाळची शांत वेळ, हवेत मस्त गारवा, अगदी हवा हवासा !आकाशातला मंद प्रकाश सभोवतालच्या अंधाराला छेद देऊ पहाणारा. मोकळी हवा छातीत भरून तुम्ही चालायला सुरवात करता आणि रस्त्याच्या कडेच्या बंगल्यातून झुडपा आडून तुम्हाला खसफ़स ऐकू येते. चमकून तुम्ही पहाता तर झुडपावर उमललेल्या कळ्या तोडण्याच काम इमाने इतबारे चाललेलं असतं. हातातली पिशवी बर्यापैकी फ़ुगलेली असते, त्या अर्थी हाताचा मालक या कामासाठी चाम्गलाच लवकर उठलेला असावा.
आपल्यापैकी सकाळी फ़िरायला जाणार्या बहुतेकजणांना दिसणारं हे नेहमीचच द्रुश्य आहे.सकाळची ही वेळ आपल्याला खर तर देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी वेळ असते, पण काही लोक घरातल्या मूर्तीला सुगंधाच्या ढिगार्याखाली गुदमरून टाकण्यातच धन्यता मानतात.
या फ़ूलवेड्या [फ़ूलतोड्या ? ] माणसाना आपण काही सांगायला गेलो तर त्यांचं प्रमुख उत्तर असतं की, " काय झालं, देवासाठी चार [ ? ] फ़ुलं तोडली तर ? " एकीन तर मला ठणकावून साम्गितलं , " अहो, आमच्या गणपतीला रोज लाल फ़ूल लागतंच. " आता बोला आहे काही उत्तर ? सगळ्यात कहर म्हणजे माझ्या फ़िरण्याच्या वाटेवर मला एक माणूस नेहमी दिसतो. हातातल्या पिशवीबरोबर दुसर्या हातात बारीक काठी घेऊन चालणारा. प्रथम मला वाटलं की भटक्या कुत्र्यासाठीची ती व्यवस्था असावी, पण नंतर दिसलं की झाडावरची हाताला न येणारी फ़ुलं काढायला तिचा उपयोग होतो.एवढं कमी असतं म्हणून हे गृहस्थ दगड मारून फ़ुलं " पाडण्याचा " उद्योग करत असतात.
खरंच माणसं असं का वागतात ? फ़ुलवाल्याकडे फ़ुलाचा एक पुडा लावणं इतकं महाग असतं का? दुसयाने लावलेली, वाढवलेली फ़ुलं तोडताना एक क्षणभर सुध्दा त्याच्या मनात अपरधीपणाची भावना का येत नाही ? खरच माणसं अशी का वागतात ? की त्यांनी लहानपणी कधी साने गुरुजी वाचलेलेच नसतात ?फ़ुलाच्या गंधाने , त्याच्या कोमलतेने त्यांच्या अंगावर सुखद शहारा उमटलेला नसतो ? खरच माणसं अशी का वागतात ? का ?

1 comment:

Asawari said...

Reminds me of an incident which took place a couple of years ago when I was staying in Pune. I used to go for a jog in the morning and early morning every day I saw this old & frail looking lady filling a huge bag with flowers from the plants in the compound next to my apartment. It had crossed my mind several times to ask her if she needed my help in plucking the flowers (considering I was almost a foot and half taller than her) but thankfully I never got around to asking her.

Thankfully because one day when I got a bit late in returning from my jog I saw a total stranger (an old gentleman this time) plucking flowers from that old ladys plant. In all agitation I went and scolded the guy for stealing from an old & helpless lady only to be told that HE and not her was the owner of the place and the plant too!!!! AND he did not even know of any lady plucking these flowers, though he did admit wondering why the flowers seemed lesser in number every day than the buds were the prior evening :)