दाणे
आमच्या मैत्रिणी म्हणजे अफलातून आहेत. आता सत्तरी आली तरी डोक्यातून काहीतरी विचित्र कल्पना निघत असतात. त्या दिवशी असंच झालं . कोशिम्बिरीत दाण्याचं कूट घालावं की खोबरं असा विषय चालला होता तरविजी म्हणाली की दाणे या विषयाची किती माहिती तुम्हाला आहे ते बघू या. म्हणजे लागला की नाही डोक्याला भुंगा.
दाणे म्हटलं तर विचार करायला हवा की शें गदाणे की ज्वारीचे दाणे की बाजरीचे दाणे ? बरं शेंगदाणे म्हटलं तर कच्चे दाणे की भाजलेले दाणे ? आता कच्चे दाणे म्हटलं तरी दडपे पोह्यात किंवा कांदे पोह्यात तेलात तळून घातलेले दाणे की चाकवतात किंवा अळूच्या फतफत्यात भिजवून घातलेले दाणे ? बरं भाजलेले दाणे म्हणावं तर चिवड यातून वेचून खाल्लेल्या खमंग दाण्याची चव जिभेवर घोळणार आणि त्याचा वेळी असे दाणे वेचून खाल्ल्याबद्दल आईने पाठीत दिलेला रपाटा आठवून तीच जीभ दाताखाली येणार.आणि पाठ हुळहुळणार ते वेगळंच. मीठ घालून उकडलेल्या शेंगा फोडताना पिचीक्कन मिठाचं पाणी डोळ्यात जातं आणि डोळे चुरचुरतात ,' पण त्या दाण्यांची थोडी खारट , थोडी मातकट चव म्हणजे मस्तच !पण काहींना लोखंडाच्या कढईत खमंग भाजलेले दाणे खाणं म्हणजे परमानंद वाटतो. किंवा कच्चे दाणे आणि गूळ वाटीत घेवून गोष्टीचं पुस्तक वाचता वाचता खाल्लेल्या दाणे गुळाची चव लोणावळा दाणे चिकीपेक्षाही भारी वाटते. शिवाय दाण्याचे दोन भाग करून आत गूळ भरून भावलीच्या लग्नात बनवलेले लाडू तर उच्च कोटीचेच असतात. या सगळ्या दाणे प्रकाराला आपल्या बालपणीचा स्वाद असतो आणि निरागस आनंदाचं वेष्टन ! नाहीतर मग असतातच मोठेपणी " दाण्याचं कूट अंमळ कमीच झालं होतं हो ! "किंवा " आग ' उद्याचं उपासाचं लक्षात आहे ना? नाहीतर वेंधळ्यासारखी खिचडी करायच्या ऐन वखताला घेशील दाणे भाजायला . " किंवा " अहो , उद्या अगदी साधा बेत करा बरं का . गरम गरम भाकरी , लोणी दाण्याची चटणी मिरचीचा खर्डा आणि साइचं दही." असेही दाने भेटीला येतात .कि मग घ्या विरजण लावायला , लसून सोलायला, खलबत्त्यात दाणे कुटायला आणि पाठवा पिंट्याला गिरणीत ज्वारी दळून आणायला . अशी ऑरडर सोडणा-या पुरूषांच बरं असतं .त्यांना काय मित्र जमवून बेसन पिठात घोळवून तळलेले शेंगदाणे ग्लासातल्या सोनेरी पेयाबरोबर तोंडात टाकत शाम और भी हसीन ,रंगीन करायला काय जातंय ?
ज्वारी बाजरी आणि गव्हाचे पण दाणेच असतात आणि कणसाचेही दाणेच असतात . पावसाळी हवेत निखा-यावर भाजलेलं कोवळ कणीस मीठ लिंबू चोळून दातात घुसवल की पावसातल कंच हिरव ओलेपण अंगाला वेढून येतं , किंवा हिवाळ्याची धुक्यात लपेटलेली गार शिरशिरी लोकरीच्या कपड्यातूनही आत शिरून अंगावर काटा फुलवते . आता मक्याच्या कणसाचे दाणे किंवा किसून त्याचा उपमा करा किंवा बटाटयाच्या संगतीनं त्याचं पेटीस करा किंवा सूप करून डाएटची जागा भरा हे सगळे तद्दन शहरी प्रकार .
मटारच्या दाण्याबद्दलही मला तेच वाटतं . शेतातले वेलीवरचे कोवळे मटार बाजारात आले की ,उपम्यात , पोह्यात शिरून त्यांची चव वाढवतात हे खरच , पण त्याबरोबरच मटार उसळ ब्रेड ,मटार भात ,मटार करंज्या बनून आपल्या मेजावानीच ताटही सजवतात . पण वेलावरून तोडून तोंडात टाकलेल्या मटार दाण्याची सर त्याला नाही .

कुठल्याही वस्तूशी आपल्या आंबट गोड आठवणी जडलेल्या असतात . दाणे ते काय एवढासा शब्द . पण त्याच्या अर्थात एवढी विविधता दडलेली असेल आणि ती इतकी अनंददायक असेल असं वाटलं होतं का आपल्याला ? शिवाय अक्षरही मोत्याच्या दाण्यासारखं असलं तरच वाचणार ना कोणीही ?
इति दाणे पुराण समाप्त !